मार्गदर्शकांचे मनोगत
श्री. शुभम मराठे (सर)
CAMMANDO
२०१७ पुणे शहर पोलीस टॉपर, २०१८ पोलीस ट्रेनिंग सेंटर टॉपर
नमस्कार,
प्रत्येक गाव खेड्यातला कष्टकरी मायबापाचा मुलगा कुठेतरी प्रशासकीय सेवेत जाता यावं अथवा शासकीय नोकरी मिळावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगा टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण पद्धती अवलंबून तयारी करणं गरजेचं आहे. तरच आपण या स्पर्धेत टिकू शकू. शिवचैतन्य फाउंडेशन व शिवचैतन्य अकॅडमीच्या माध्यमातून आज पर्यंत हजारो होतकरू विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेचे वर्दीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
अत्यंत नियोजनबद्ध शेड्युलसह शिवचैतन्य मागील काही वर्षापासून पोलीस भरती, आर्मी भरती, सरळसेवा भरती यामध्ये गुणवत्तापूर्ण निकालासह काम करत आहे. सोबतच आता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचे निवासी शिक्षण संस्था शिवचैतन्य माध्यमातून साकारली जात आहे. या शिक्षण संस्थेमुळे गाव खेड्यातल्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे. शालेय शिक्षण पूर्ण करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चा बराचसा वेळ अभ्यासात जातो तो या उपक्रमाच्या माध्यमातून नक्की वाचेल.
शेवटी एकच असणार आहे होतकरू कष्टकरी, अनाथ गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिवचैतन्य कायम अग्रेसर असेल. शिवचैतन्य टीमला भावी वाटचालीस शुभेच्छा.
श्री.निलेश झेंडे (सर)
इंडियन आर्मी
नमस्कार मित्रांनो,
मी निलेश बाळासाहेब झेंडे आपल्यासमोर मनोगत व्यक्त करताना काय लिहाव हे सुचत नाही पण मनापासून दोन शब्द लिहतो. आयुष्यामध्ये मोटीवेशन बाहेरून कधीत मिळत नाही ते आपल्या आईवडीलांच्या कष्टातुन मिळते, आईवडीलांचे कष्ट डोळयासमोर ठेवून सातत्यपुर्ण एक ते दीड वर्ष भरती क्षेत्रात मन लावून प्रयत्न केला तर अंगावरती वर्दीरूपी विजयाचा गुलाल नक्की पडतो हा माझा अनुभव आहे. आपल्या प्रामाणिक कष्टासोबत शिवचैतन्य फाउंडेशन सदैव एका परिसाच काम करेल. आकाशात उंच झेप घ्यायची असेल तर, नुसते पंख असून चालत नाही. तर त्या पंखामध्ये बळ असने आवश्यक आहे. ते बळ देण्याचे काम शिवचैतन्य करेल. स्पर्धा परीक्षामध्ये पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल, आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.
म्हणून एकच सांगेन उद्याचे यश त्यांनाच मिळणार ज्यांनी आजपासूनच तयारी सुरू केली आहे. मुलांमध्ये शिस्त, संस्कार व आत्मविश्वास रूजवणारी एकमेव संस्था म्हणजे शिवचैतन्य फाउंडेशन पुणे. एकप्रकारे भावी प्रशासकिय अधिकारी घडवणारी फॅक्टरी आहे. असे म्हंटले तर चुकिच ठरणार नाही. शेवटी येवढच म्हणेल स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्पप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपुच देत नाहीत. भावी प्रशासकिय अधिकारी होण्यासाठी आजच शिवचैतन्य फांउडेशन पुणे याठिकाणी या आणि आपले व आपल्या आईवडीलांचे स्वप्न पुर्ण करा.
